दारुबंदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय परिसराचा केला उकंडा ! जप्त वाहनावर कोसळले झाड उडाली दैना !!

दारुबंदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय परिसराचा केला उकंडा !


जप्त वाहनावर कोसळले झाड उडाली दैना !!


महाराष्ट्र २४ आवाज



जिल्हा प्रतिनिधी- व्यंकटराव पनाळे 


लातुर : दि. १८ - दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांच्या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे मध्यवर्ती प्रशासकीय इमारती च्या परिसराचा उकंडा झाला आहे. दारुबंदी अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाहने या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात लावून मैदानात पूर्ण दैना उठवली आहे. या मैदानात दारुबंदी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले अनेक वाहने लावलेले असून त्यामध्ये एक ट्रक पण आणून लावलेला आहे. या ट्रक वर मैदानातला एक वृक्ष कोसळून वाहनावर पडला आहे. दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांच्या मनमानीमुळे प्रशासकीय इमारतीच्या आत आणि प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील मैदानातही दुर्गंधी पसरली आहे.  


जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह सर्व शासकीय इमारतींची आणि परिसराची देखभाल करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांचे कार्यालय आहे. या संपूर्ण देखभालीसाठी स्वतंत्र शाखा अभियंता असून ते नेमके करतात काय हाही एक प्रश्नच आहे. तरीसुद्धा इमारतीमधील दुर्गंधी आणि परिसरातली घाण वाढण्यास दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांचे कार्यालय हेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image