द.ग.तटकरे काॅलेज तळा येथे आॅनलाईन वाचन प्रेरणा दिन साजरा
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- श्रीकांत नांदगावकर
तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे निमित्ताने ऑनलाइन ग्रंथप्रदर्शन व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री मंगेश प्रभाकर देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास गणपतराव निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या जीवनात पुस्तकाचे महत्व खूप मोलाचे आहे, पुस्तके वाचूनच आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो. वाचन केल्याने आपल्याला प्रगती करता येते, हवे त्या ध्येयाची प्राप्ती आपल्याला वाचनामुळे शक्य होते, वाचनामुळे माणूस विचारी बनतो मग सुसंस्कृत होतो. वाचनामुळे मनुष्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होते. काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभाग प्रमुख डॉ.नानासाहेब यादव यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे महत्व कुमारी प्रेरणा शेळके या विद्यार्थ्यांनीने सांगितले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी कविता सादरीकरण केले. कवी डॉक्टर संजय बोरुडे व कवी डॉक्टर विनायक पवार यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. या काव्यवाचन स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कविता सादर केल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंबाळकर प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोज वाढवळ यांनी केली सर्वांचे आभार मानून झाली.