नवरी मुलगी परीक्षा देऊन आली व लग्नासाठी बोहल्यावर राहिली उभी !
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतानिधी- महादेव महाजन
अहमदपूर : अहमदपूर तालुक्यातील एम.एस.सी. केमिस्ट्री केलेली मुलगी सध्या बी.एड.करीत असून द्धितीय वर्षाची परीक्षा ती देत आहे. दोन पेपर झाले असून एक पेपर आज दि.19/10/2020 रोजी ऐन लग्नाच्याच दिवशी आहे आणि विशेष म्हणजे परीक्षेची वेळ ११.३० वा. तर लग्नासाठी बोहल्यावर उभी राहण्याची वेळ २.३५ मि. किती अजब आहे ना. रात्री हळद लागली की आई, वडील व नातेवाईक नवरी मुलीला किमान दोन दिवस घराबाहेर पडू देत नाहीत पण या हिप्पळगावच्या नवरी मुलीने तर चक्क हळद लावून परीक्षा दिली आणि परीक्षेहून आल्यास काही मिनिटांत ती लग्नासाठी बोहल्यावर उभी राहिली ही आहे शिक्षणाची ताकद.आई वडील खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्यामुळे या नवरी मुलीचा आत्मविश्वास वाढला आणि ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ, मुक्ता साळवेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतल्यामुळे कोणत्याही संकटाशी सामना करण्याची जिद्द तीने आत्मसात केली आहे. मुलगी शिक्षण घेतल्यावर काय काय करू शकते हे अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगावच्या व-हाडी मंडळीनी घेतलेला एक सत्य अनुभव म्हणजे परीक्षेहून आल्यावर लग्नासाठी बोहल्यावर आत्मविश्वासाने उभी राहिलेली मुलगी. म्हणून मुलगी शिकवा, मुलगी वाचवा, मुलीचे शिक्षण कुटुंबाचे रक्षण, एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते हा संदेश आज या मुलीने दिला. सलाम ताई तुझ्या भावी आयुष्याला !