प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वैद्यकीय नीट परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान.
डॉ.देव्हारे यांनी दिल्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा!
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अमरावती : अंजनगाव शहरातील सामान्य कुटुंबातील मुजबाहउल्ला खाँ या विद्यार्थ्यांने वैद्यकीय नीट परीक्षेत ५९७ गुण मिळवून शहराचे नाव उंचावले आहे. अकोला येथील गावंडे कोचिंग क्लासमध्ये नीटसाठी शिक्षण घेतलेला हा विद्यार्थी आपल्या काकांना यशाचे भागीदार मानतो. सामान्य कुटूंबातील हा विध्यार्थी वैद्यकीय अभ्यास करण्याचे मानसिकतेत आहे. "युवकांनी समाज सेवेचे व्रत घेऊन वैद्यकीय सेवा करावी. आज फक्त व्यावसायिक दृष्टीने वैद्यकीय क्षेत्र निवडल्या जाते. मात्र तसे करणे आपल्या पवित्र शिक्षणा सोबत अन्याय आहे. रुग्ण डाॅक्टरकडे देवाचे रूप म्हणून पाहतो. त्याचे व्याधीतून त्याला परावृत्त करणे हाच ध्यास मनात असला पाहिजे". असे डॉ. मंगेश देव्हारे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. मुजबाहउल्ला हमारे मोहल्ले की शान है। वह अपने परिवार और शहर का नाम जरूर रोशन करेगा। डॉ.शाकिब मुजबाहउल्ला यांचे यशाबद्दल डॉ. मंगेश देव्हारे, डॉ.शाकिब, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन हुरपडे शहर अध्यक्ष मो. वसीम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.