प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या संकल्पनेतून कोविड योध्दा सन्मान!
आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेनं जगावं ! पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- सागर पनाड
बुलढाणा : आपण ज्या गावात राहतो, जी आपली कर्मभूमी आहे तिच्याशी बांधिलकी जपत आपण या भूमीचं या समजाचं देणं लागतो. या कर्तव्यभावनेननं जगणारा कायम वैभवसंपन्न राहत असतो असे भावोद्गार मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आत्मराम प्रधान यांनी नूकतेच कोविड योध्दा सन्मान समारंभा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले .
कोरोना संसर्गाच्या विळख्याने सर्वत्र हाहाकार माजल्याने अनेक वेळा लॉकडाऊन करून शासनाने संसर्गाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. अनेक गोरगरीब मजूर वर्गाने पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात धाव घेतली होती मात्र कोरोनाने या सगळयांना आपल्या गावाची वाट धरण्यास भाग पाडलं !
संपूर्ण लॉकडाऊन असल्याने लोक आपल्या चिल्यापिल्यांना घेवून हजारो किलोमीटर पायी चालत निघाले जवळ पैसे असूनही खायला अन्न व प्यायला पाणी मिळणंही कठीण झालं होतं ! माणूस माणसांपासून दुर जात होता, मात्र याही परीस्थितीत सुलतानपूर येथील अनेक जिगर बाजांनी माणूसकी जपत माणसात देव शोधण्याचा प्रयत्न केला. घराबाहेर निघण्यास मज्जाव असतांना सुल्तानपुरवासीयांनी आपल्या गावी पायी चालत जाणाऱ्या अनेकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. कोणी फराळांचे नियोजन केली.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार बंद असल्याने बऱ्याचं कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवनाचाही बिकट प्रश्न निर्माण झाला असतांना हा प्रश्न देखील अनेकांनी सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली तर सुलतानपूर येथील विद्यमान विविध पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्याबरोबरचं सामाजिक दायित्वाचा प्रत्येय दिला! आम्ही या सर्वांच्या सोबत राहून त्यांच्या कार्याला प्रसिद्धी देत कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत लढण्याचं बळ दिलं म्हणूनंच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष सागर पनाड यांच्या संकल्पनेतून नागार्जुन ज्ञान विज्ञान संस्थेचे श्री डॉ.मधुसुदन पवार यांनी ग्रांऊड झिरोवर काम करणाऱ्या कोविड योद्धाची दखल घेतली व दिनांक ५ सप्टेंबर रोजी सुलतानपूर येथे वै.अ.प्रल्हाद जायभाये, तलाठी प्रमोद दादंडे,पो.हे.कॉ. प्रभाकर सानप, ग्रामविकास अधिकारी संतोष क्षिरसागर, डॉ. अमोल बोराळकर, डॉ.समाधान वाघ, डॉ.राम कडूकर ,आशासेविका सारिका क्षिरसागर, सौ.अनुश्री सोनूने, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष सागर पनाड, पत्रकार राजू पठाण, पत्रकार सुनिल हरकाळ, संतोष तोतरे, ग्रामपंचायत कर्मचारी सिध्देश्वर सुरुशे, भिकाजी भानापूरे सह गावातील विविध क्षेत्रात कोविड १९ च्या काळात प्रत्येक्ष-अप्रत्यक्ष गरजवंता मदतींचा हात देणारे त्यांच्या कार्याचा व्यक्तिश: उल्लेख करीत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करीत पुढील काळात त्यांच्या सामाजिक कार्याला अश्वगती प्राप्त होऊन हत्तीचं बळ मिळो ! अशा भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर विनायकराव काळे यांनी व्यक्त केल्या. यावेळी संघपाल पनाड, सुखदेव पवार,शरद अंभोरे, दिपक धोत्रे, संजाब पनाड, ज्ञानेश्वर पडघान, मोहन मानघाले, महेंद्र पनाड आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालनाची यशयस्वी जबाबदारी प्रकाशराव चव्हाण यांनी पार पाडली. परंतु शिस्तबद्ध कार्यकमाची यशस्वी जबाबदारी विवेकानंद स्टडी सर्कलच्या युवकांनी पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले .