अकोट पोलीस विभागाचे गुन्हेगारांना सहकार्य
मामला चोरीच्या गुन्ह्याचा
चार महिन्यापासून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट
चोरीचा ऐवज परत कधी मिळणार फिर्यादीचा टाहो
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अमरावती : अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील विनोद गुजर यांचे राहत्या घरी दी. २२ जून रोजी दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसल्याचे पाहून गावातच राहणाऱ्या काही संशयितांनी कपाटातील सोने व नगदी रक्कम उडविली असल्याची तक्कार विनोद याने अकोट पोलीस स्टेशनं मध्ये दाखल केली. सांगितलेल्या घटने नुसार पोलीस कर्तव्यावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांने फिर्याद न नोंदविता सांगितलेले संशयित आरोपी फिर्यादी मधून गहाळ केल्या गेले. ज्यावर फिर्यादी विनोद याने वारंवार सांगून देखील त्यात सुधारणा झाली नाही त्याच प्रमाणे त्या अप. क्र. १५९/२०२० भादंवि ३८० मध्ये कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे फिर्यादी विनोद याने ग्रा. पोलीस अधीक्षक यांचे कडे तक्कार अर्ज दाखल केला. मात्र त्यावर देखील कोणताही कार्यवाही झाली नाही. ज्यावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनं गुन्हेगारांना हेतुपुरःसर पाठीशी घालत असल्याचे लक्षात येत आहे. चोरीचा घटनाक्रम लक्षात घेता फिर्यादी सकाळ पासून आपल्या शेतात होता. दुपारच्या दरम्यान घरी असणाऱ्या फिर्यादीचे मुलीने संशयित अरोप्याना फिर्यादीचे घराच्या मागील बाजूस चक्करा मारताना पाहिले. सायंकाळी पाच वाजता चोरी होण्याचे उघड होण्या पूर्वी गावातील एका इसमास गावात चोरी झाल्याची सूचना होती. ज्याचे नाव पोलीस विभागास सांगण्यात आले होते. गावातील संविधानिक पदावर असणारा व्यक्ती वारंवार पोलीस कर्मचाऱ्यांचे मागणीचा निरोप विनोद यास देऊन पोलीसांची भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. श्वान पथकाचे मार्फत चोरीचा तपास न करता फिर्यादी यास त्यात धमकविण्याचा गैरप्रकार केल्या गेला. ह्या सर्व गोलमोल कार्यवाही वरुण पोलीस विभागाचे अकार्यक्षम कार्यवाही निदर्शनास आणून देत असून फिर्यादी यास वारंवार मानवाधिकार आयोगाची धास्ती दाखवून कार्यवाही साठी विलंब कसा होत आहे हे दाखवीत आहे. मात्र आरोपी हे गावात पोलीस विभागास पैसे देऊन आम्ही सुटलो असल्याची बतावणी करीत आहेत. झालेल्या लेनदेण वरुण फिर्यादी कशा प्रकारचा दोषी आहे ह्याबाबद पोलीस सर्वत्र चर्चा करीत आहे. ह्यासर्व गैरप्रकाराचे विरुद्ध वी. न्यायालयात फिर्यादी धाव घेणार असून पोलीस विभागा विरुद्ध दाद मागणार आहे. फिर्यादी ह्याने थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून येणाऱ्या काळात पोलीस विभाग निरुत्तर होणार असे दीसत आहे.