'कोविड-१९' च्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी घरातूनच अभिवादन करावे - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन !

'कोविड-१९' च्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी घरातूनच अभिवादन करावे - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन !


महाराष्ट्र २४ आवाज



विभागीय प्रतिनिधी- पंडित मोहिते-पाटील


मुंबई दि. ७ : 'कोविड-१९' च्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. ६ डिसेंबर २०२० रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.


सह्याद्री अतिथीगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या योजनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले, देशात व राज्यात 'कोविड' विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अनुयायांनी घरातूनच अभिवादन केले होते, तसेच विविध सण उत्सव सुध्दा 'कोविड-१९' विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार साधेपणाने साजरे केले आहेत. आता ६ डिसेंबरला शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील त्यानुसार यावर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर न जाता घरातूनच अभिवादन करावे. शासकीयस्तरावर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येईल, असेही आठवले यांनी सांगितले.


यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (स्मारक) चैत्यभूमी या वास्तूचे नूतनीकरण करण्याबाबतचा, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ योजना आणि इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'कोविड'विषयक मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आले.


यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे आणि अन्य पदाधिकारी तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सामाजिक न्याय, नगरविकास, गृह विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image