मुख्यमंत्री कोविड १९ साठी ब्ल्यूक्रॉस कंपनी तर्फे १ कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- महेश कदम
मुंबई :मुख्यमंत्री कोविड १९ साठी ब्ल्यूक्राॅस कंपनीतर्फे १ कोटी रूपयांची मदत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे देण्यात आली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री.भालचंद्र बर्वे साहेब, कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर श्री.आशिष शिरसाट आणि श्री. कृष्णा महाडिक ( सामाजिक कार्यकर्ते व व्यवस्थापक नाना पालकर स्मृति समिती) हे उपस्थित होते. श्री कृष्णा महाडिक हे व्यक्तिमत्व सामाजिक कार्याला वाहून घेतलेले असून समाज,राज्य आणि देशाचा विकास झाला पाहिजे या ध्येयाने झापाटून विविध गरजू, गरीब व शैक्षणिक संस्थाना मदतीसाठी धावून जातात.