किनगांव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन जळून खाक, प्रचंड नुकसान
महाराष्ट्र २४ आवाज
किनगाव : ( महादेव महाजन)अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील रहिवाशी शेतकरी धनराज नारायण गिरी यांच्या सोयाबीन गंजीस अज्ञात संशयिताने आग लावून दिली असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. किनगाव येथील गट नं 307/2 येथील धनराज नारायण गिरी यांची जमीन असून या जमिनी मध्ये सोयाबीनचे पीक घेण्यात आले होते. सध्या पाऊस उघडला असल्याने शेतकऱ्यांकङून सोयाबीन काढणीला वेग आला आहे; त्यामुळे गिरी या शेतकऱ्याने शेतातील सोयाबीन पीक काढून त्याची गंज करून ठेवली होती. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने आग लावल्याने नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनसापुरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून तलाठी हंसराज जाधव यांनी सदरील घटनेचा पंचनामा केला व अहवाल तहसील कार्यालयाकङे पाठविला आहे. सहा महिने पिकांचे संगोपन करून ऐन वेळेला असा घात झाल्याने या शेतकऱ्याचे सगळे स्वप्न धुळीस मिळाल्याने परिसरातून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकङून काहीतरी मदत मिळेल अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. एकंदरीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास किणगाव पोलिस करीत आहे.