कोकण कट्टा समाजसेवी संस्थेकडून "बालग्राम" च्या मुलांसाठी भिक्षाफेरीतून मदत

कोकण कट्टा समाजसेवी संस्थेकडून "बालग्राम" च्या मुलांसाठी भिक्षाफेरीतून मदत


महाराष्ट्र २४ आवाज



रोहा/समीर बामुगडे


रविवारी कोकण कट्टा ह्या विलेपार्ले या समाजसेवी ग्रुपने ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील "बालग्राम" च्या अनाथ,गरीब,आदिवासी आणि गरजू मुलांसाठी माणुसकीची भिक्षाफेरीतून बाराशे किलो धान्य व दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर कोकण कट्टा आयोजन समितीच्या सौ. आकांक्षा पितळे व सौ. स्नेहल कदम संस्थेचे कार्यकर्ते सुनील वनकुद्रे जयवंत घावरे, सुभाष कांबळे, सुजित कदम, राहुल वर्तक, दया मांडवकर, रवी कुळे, हर्षल धराधर, दशरथ पांचाळ यांनी रविवारी भिक्षाफेरीतून मिळालेले साहित्य बालग्रामचे प्रकल्प समन्वय उदय गावंड,जन संपर्कप्रमुख राजेश रसाळ यांच्यासह बालग्रामच्या विध्यार्थ्यांकडे सुपूर्द केले यावेळी कोकण कट्टाचे सदस्य संतोष कदम आणि दादा गावडे यांनी आपला वाढदिवसही ह्या मुलांसोबत साजरा करत मुलांना त्यांना मिष्टान्न दिले विशेष म्हणजे पार्लेकर रिक्षाचालक प्रभाकर सांडम यांनी त्यांच्या रिक्षांमध्ये ठेवलेल्या दानपेटीतुन मिळालेल्या देणगीतून पंचवीस मुलांना बूटं दिल्याने उपस्थित सर्वांनी ह्या तरुणाच्या दातृत्वाचे कौतुक केले.



Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image