एम.पी.एस.सी.ची रद्द झालेली परीक्षा त्वरीत घ्यावी
ओ.बी.सी.जनगणना परिषेदेचे धरणे आंदोलन व निदर्शने
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- संजीव भांबोरे
भंडारा - ओबीसी जनगणना परिषद भंडारा जिल्ह्याच्या वतीने एम पी एस सी ची रद्द झालेली परीक्षा त्वरीत घेण्यात यावी व ओ.बी.सी.च्या विविध मागण्यासाठी भंडारा येथे धरणे आंदोलन व निदर्शने करून मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, क्रिमिनलची अट रद्द करण्यात यावी, ओबीसीच्या मुलांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, नोकरीत पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, विध्यार्थ्याना उपस्थिती भत्ता देण्यात यावा, शेतकऱ्यांना 100% सबसिडीवर कृषी अवजारे मिळाली पाहिजेत, पोलीस भरती त्वरित सुरू करा, ओबीसी विध्यार्थ्याना मोफत गणवेश देण्यात यावे आदी मागण्याकरिता जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले, निवेदन देतेवेळी सदानंद इलमे, भगीरथ थोटे,डॉ मुकेश पुडके, के झेड शेंडे, संजय मते, उंबराव सेलोकर , योगराज येलमुले, माधवराव फसाटे, प्रभू मने, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.