जाहुर तलावात बुडून नवतरुणास २४ तास उलटले तरी नवतरुण मुलास बाहेर काढण्यात प्रशासनास अद्याप अपयश
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा मागविणे तातडीचे
महाराष्ट्र २४ आवाज
मुखेड/ भारत सोनकांबळे
मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर ता.मुखेड येथील नव तरुण युवक नामे माधव चांदू भुयारे हा दैनंदिन प्रमाणे दि.२१ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गावाजवळील तलावात पोहायला जाऊन तलावतच गायब झाल्याची घटना घडली असून घटना घडून २४ तास होवून गेले परंतु प्रशासन यंत्रणा अतिशय मंदगतीने कार्य बजावत असल्याने संबंधित प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. माधव भुयारे हा अतिशय हुशार व होतकरू जिद्दी असलेला नवतरुण मुलगा नुकताच दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी मेकॅनिककल इंजिनिअरिंग ची परीक्षा दिला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.माधव भुयारे च्या दुर्दैवी मृत्यू ने जा गावामध्ये व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. संबंधित प्रशासनाने आपत्कालीन सेवा मागवून त्वरीत त्या तलावात बुडलेल्या नवतरुण मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात यावे असे गावकऱ्यांकडून बोलल्या जातय.