प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी विचार चक्र या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक रमेश नाटकर यांची निवड
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
परभणी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी विचार चक्र या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक रमेश गो. नाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
रमेश नाटकर गेल्या 21 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात जनसामान्यांचा आवाज म्हणून उल्लेखनिय कार्य करित असून दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रमेश नाटकर संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, परभणी जिल्हाध्यक्ष भुषण मोरे यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
डी.टी.आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411