प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे स.पोलीस निरीक्षक जी.एस. पांडव यांचा सत्कार.
स.पोलीस निरीक्षक जी.एस.पांडव यांनी केली कोरोनावर मात
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- अनिल राठोड
यवतमाळ : कोरोना सारख्या कठीण काळात ज्या कोरोना योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी झटले असे कोविड योद्धा स.पोलीस निरीक्षक जी.एस. पांडव यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दराटी सारख्या अतिदुर्गम भागात दराटी पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक पांडव हे आपली सेवा देत असून स्वतः ते जनतेची सेवा करीत कोविड काळात सेवेसाठी असताना त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली व पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले.
जंगल भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दराटी येथे पांडव यांनी अतिशय कुशलतेने परिस्थितीवर पकड ठेवली असून सर्वांशी ते मनमोकळे राहत असल्याचे गावक-यानी सांगितले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटने मार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, कोषाध्यक्ष गजानन गांजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष,उदय पुंडे,उपाध्यक्ष मारोती गव्हाळे, पदाधिकारी सचिव मोहन कळमकर, पत्रकार मैनुद्दीन सौदागर आदी सदस्य उपस्थित होते.