तळा तालुक्यातील कुडा लेण्यांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी

तळा तालुक्यातील कुडा लेण्यांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी


महाराष्ट्र २४ आवाज



 तळा( नितीन लोखंडे) पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी या परिसराच्या विकासाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून कुडा लेण्यांच्या वृद्धीसाठी पाहणी केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यांनी कुडा लेणी, गोलघुमट मुरुड, राजपुरी येथून जंजिरा किल्ला, मुरुड जंजिरा समुद्रकिनारा, खाेरा जेट्टी मुरुड, नवाब पॅलेस मुरुड येथील पाहणी करून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत पाहणी करून चर्चा केली.


‌रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटन स्थळापैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचिन बौध्द लेणीचा उल्लेख केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये कुडे प्राचिन बौद्ध लेण्यांची नोंद आपणास पाहवयास मिळते. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लेण्यांची निर्मिती केली. गेली अनेक वर्षे नागरीकांकडून लेणीचा विकास करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्याची आज पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.अदिती तटकरे यांनी गांभीर्याने दखल घेत पर्यटन विभागाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन, वन अधिकारी, तळा तहसीलदार यांच्या समवेत पाहणी दौरा केला. यावेळी पालकमंत्री यांच्या समोर तहसीलदार यांनी लेणीविषयक मँप सादर करून लेणीचा विकास आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधिन राहून अधिक चांगल्या पध्दतीने कसे करता येईल या विषयी चर्चा करण्यात आली.


 यावेळी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तळा तहसिलदार अण्णप्पा कनशेट्टी, मंडळ अधिकारी निलेश गावाणकर, मंडळ अधिकारी मांदाड श्री.ठाकर, मांदाड तलाठी अनिकेत पाटील, तळा तलाठी प्रवीण गवई, गटविकास अधिकारी श्री.यादव, पोलीस निरीक्षक श्री. गेंगजे, तळा,पंचायत समिती, रा.जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती गिताताई जाधव, रा.जि.प. सदस्य बबन चाचले, तळा सभापती देवकी लासे, उपसभापती गणेश वाघमारे, मांदाड सरपंच तानाजी काप, माणगाव वनक्षेत्रपाल पी. आर. पाटील, तळा वनपाल विजय पाटील, सरपंच तानाजी कालप, वनरक्षक श्री.दिघे, श्री.पाटील, श्री.कदम हे उपस्थित हाेते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image