मनिषा वाल्मीकीवर बलात्कार करण्यार्‍या नरामाधास फासी द्यावी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अमरावती जिल्हा महिलाध्यक्षा उषा पानसरे

मनिषा वाल्मीकीवर बलात्कार करण्यार्‍या नरामाधास फासी द्यावी


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या अमरावती जिल्हा महिलाध्यक्षा उषा पानसरे 


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


अमरावती : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे चार नराधमानी मनिषा वाल्मिकी या भगिनीवर बलात्कार करणा-या नराधमास फासी द्यावी अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा उषा पानसरे यानी मागणी केली आहे. जनतेनी जागे व्हावे व झोपेतून उठावे. अापल्या भारतात हे काय घडत अाहे ? त्याचा निषेध करा. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबरला मनिषा नावाच्या मूलीवर 14 /9 /2020 गरिब वाल्मीकी समाजाच्या 18 वर्षीय मुलीला तिच्या अाई समोर शेतातून उचलून नेले व त्या चार नराधमांनी तिच्यावर पावशी बलाल्कार केला ते निच कृत्य केल्यानंतर त्यांनी तिची जीभ कापले, शरिराचे हाड तोडल्या,मणका अाणि मानेवर घाव घातला अशा क्रूरपणे मारल्यानंतर तिला तिथेच सोडून पळाले त्या दूर्दैवी मूलीचा दिल्ली येथे रूग्णालयात मृत्यू झाला. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडल्या नंतर उत्तरप्रदेशच्या पोलीसांनी त्या मुलीचा जबरदस्तीने अत्यंविधी उरकला पशू अाणि हैवानालाही लाजवेल असे कृत्य भाजपाच्या उत्तरप्रेदेशात घडले अाहे. जिच्यावर बलाल्कार होतो ती महीलाच असते तिच्या यातना समान असतात निर्भया आणि मनिषा या दोन्ही महिलाच मग दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटनाना वेगळा न्याय का? त्यात जात धर्म शोधने हे एक निचतेचेच लक्षण अाहे? नारी वर अत्याचार दिवसे दिवस वाढतच अाहेत. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मुली, महिला सूरक्षित नाहीत. दररोज एक नविन बातमी मिळते. अमुक मुलीवर बलात्कार झाला तमूक महीलेवर अत्याचार झाला असे रोज ऐकायला मिळत आहे ? याला जबाबदार सरकारच नाही तर पोलीस प्रशासन पण अाहे.अापण कुठे तरी चूकतो ?सर्व माझ्या सखी सहेली तुम्ही जागे व्हा ! बदनामी होईल 'लोक काय म्हणतील पोलीस काय विचारतील? घाबरू नका. हिम्मंत वाढवा. होणार्‍या अत्याचारावर अावाज उठवा समोर या. घरात शांत बसू नका. अशा हैवानाला सजा देणेसाठी पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ तक्रार करा.अशा नराधमास जनता चोप द्या. मनिषाच्या चार बलात्कारी नराधमास फासी द्या. फासी द्या. फासी द्या.


 


उषा पानसरे( पत्रकार व समाजसेविका)


महिला जिल्हाध्यक्षा


प्रेस संपादक व पञकार सेवा संघ ,अमरावती जिल्हा.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image