धम्माची उत्क्रांती करायची असेल तर आरक्षणाचा विचार करता कामा नये - संजीव भांबोरे
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- संजीव भांबोरे
भंडारा - बौद्ध धम्माची उत्क्रांती करायची असेल तर आरक्षणाचा मागे न लागता डॉ. बाबासाहेबांनी 14 आकटोमबलला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भिक्षु चंद्रमणी यांच्या हस्ते बोद्ब धम्माची स्वतः दिक्षा घेतली आणि लाखो बौद्धअनुयायांनी धम्माची दीक्षा घेतली.आज आपण 64 वा धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा करतो.परंतु या भारतात किती लोक बोद्ध आहेत. आज भारतात बौद्ध 84 लाख बोद्ब आहेत आणि या देशाची लोकसंख्या 135 कोटी च्या घरात आहे. आणि आज आपण धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा करतो .ही आपली शोकांतिका आहे. जेव्हा जेव्हा जनगणना होते तेव्हा आपलेच पुढारी जात महार ,धर्म बौद्ध, जात महार- धर्म हिन्दु, जात महार- धर्म नव बौद्ध असे लिहायला सांगतात. मग धम्म कसा वाढेल. धम्म वाढवायचा असेल तर जात बौद्ध - धर्म बौद्ध लिहिला पाहिजे. नुसत्या राजकीय आरकक्षणासाठी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची अधोगती करणे योग्य नाही .असे विचार सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव भांबोरे शांती वन बुद्ध विहार चिचाळ तालुका पौनी जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यावेळीआशिया खंडातील धम्म क्रांती जेव्हा नाहीशी झाली त्यावेळी सम्राट अशोकांनी आशिया खंडात तोच धम्म वाढविण्याचे काम केले. व सम्राट अशोकांनी ज्या दिवशी युद्ध टाळून बुद्ध स्वीकारले त्याच दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध अशोका विजयाच्या दिवशी धम्म दीक्षा घेतली.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा अध्यक्ष दीपक लांजेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम होते. तर प्रमुख पाहुणे प्रशांत युवा अध्यक्ष महाराष्ट्र,पंकज वानखेडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रामटेके, डॉ अमृत बांडेबूचे विदर्भ उपाध्यक्ष, राज्य प्रवक्ते संघदीप देशपांडे , जनार्धन सुखदेवें जिल्हा उपाध्यक्ष, आशिष मेश्राम पवनी तालुका अध्यक्ष, अमरकंठ बांडेबूचे विदर्भ सचिव, महेंद्र तिरपुडे जिल्हा उपाध्यक्ष, देवानंद नंदगवळी राज्य संघटक, तुकडू रामटेके,चरणदास मेश्राम,अमित रामटेके, अश्विन देशपांडे उपस्थित होते.