तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.

तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर !


 तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन


महाराष्ट्र २४ आवाज



तळा ( सुरेंद्र शेलार) तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, रायगड भुषण समाजसेवक कृष्णा महाडिक व सायन हाॅस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.1 नोहेंबर 2020 वार रविवार सकाळी ठिक 9.30 ते 2.00 या वेळेत गो.म.वेदक विद्यामंदीर तळा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे जेमतेम सहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याने रक्तदान करण्यासाठी प्रत्येकांनी स्वयप्रेरणेने पुढे येण्याची गरज आहे. सदर रक्तदान शिबीर तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, पोलीस स्टेशन कर्मचारी वृंद तळा, नामदेव युवक मंडळ तळा, माऊली सेवा मंडळ तळा, संत रोहिदास युवक मंडळ, बौद्धजन पंचायत समिती तळा, कुणबी युवक मंडळ तळा तालुका, चंडिका पुत्र कब्बडी संघ, नाभिक संघटना तळा तालुका, मिनिडोअर संघटना तळा, व्यापारी असोशिएशन तळा, प्राथमिक शिक्षक संघटना तळा तालुका, भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा तळा, पत्रकार संघ तळा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटना शाखा तळा, संत गाडगे महाराज तरूण मंडळ परीटवाडी, तहसिल, मंडल अधिकारी व कर्मचारी वृंद तळा, पंचायत समिती कर्मचारी वृंद तळा, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी वृंद तळा, अभिनव ज्ञानमंदीर उसर,अशोक ल.लोखंडे विद्यामंदीर पिटसई, ग्रामसेवक संघटना तळा, हौशी बालमित्र मंडळ भोईरवाडी, गो.म.वेदक प्रतिष्ठान तळा, पढवण हायस्कूल, बोरघर हायस्कूल, मेडिकल असोशिएशन तळा, क्षेत्रिय मराठा समाज तळा, म.राज्य प्राथमिक शिक्षक समिती तळा, महाराष्ट्र चॅरिटी ट्रस्ट शाखा तळा तालुका, बौध्दजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या सर्व आयोजकांनी तळा तालुक्यातील नागरिक, शासकिय व अशासकिय कर्मचारी यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.


Popular posts
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
सौ.अक्षरा कदम दुस-यांदा तळा पंचायत समितीच्या सभापती
Image
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image