कोरोना, डेंगू आणि अंजनगाव नगर पालिका. अंजनगाव मुख्याधिकारी यांनी ग्रामपंचायत मार्फत शिक्षण घ्यावे साथरोग सदृश्य डेंगूची आणी गावात फवारणी मलेरियाची

कोरोना, डेंगू आणि अंजनगाव नगर पालिका.


 अंजनगाव मुख्याधिकारी यांनी ग्रामपंचायत मार्फत शिक्षण घ्यावे


 साथरोग सदृश्य डेंगूची आणी गावात फवारणी मलेरियाची 


महाराष्ट्र २४ आवाज



जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


अंजनगाव नगर पालिका मुख्याधिकारी अलोणे यांनी शहरात मलेरिया प्रतिबंधक फवारणी शहरात सुरु असण्याची कबुली दीली असून त्यांचे ह्या बयाना मुळे शहरात एकदम खळबळ झाली आहे. अंजनगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दिढ महिन्यात मलेरिया साथ रोगाचा मात्र एक रुग्णांची नोंद आहे. मात्र शहरातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणात सदृश्य डेंग्यू रुग्ण अकोट, परतवाडा, अमरावती व अकोला येथे उपचारासाठी दाखल आहेत. असे असताना शहरात मच्छर प्रतिबंधित फवारणी न करता अंजनगाव नगर पालिकेचा मुख्याधिकारी गावात मलेरिया फवारणी करीत असून सदृश्य डेंग्यू ह्यासाठी असलेल्या गाईड लाईन सोडून काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी अव्वाच्यासव्वा भावात ९००० रुपये प्रतिदिन ट्रॅक्टर फवारणी साठी घेतला. आणी शहरात सॅनेटाईझर फवारणीच्या नावाखाली मच्छरांची पैदावार करून फक्त नगर पालिकेचा आर्थिक बोजा वाढविला.



त्यावर नगर पालिका आरोग्य विभागाने कोणताही मच्छर प्रतिबंधित उपाययोजना न राबविता साथीच्या रोगाचे प्रमाणात वाढ केली. आरोग्य विभागात असणाऱ्या आरोग्य विभाग प्रमुखांना वारंवार मच्छर प्रतिबंधित फवारणीच्या मौखिक सूचना दिल्या. जनमाध्यम वृत्तपत्रातून देखील डेंग्यू ह्या रोगाची लागण शहरात झाल्याचे निदर्शनास आणून दिल्या गेले मात्र आर्थिक तडजोडीवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या आरोग्य विभाग प्रमुखांनी शहरात सदृश्य डेंग्यू व साथीच्या रागाचे प्रमाण वाढविले. फक्त स्वच्छतेचा जागर प्रसिद्धी फलकावर करून शहराला साथीच्या रोगाचे ग्रहण लावल्या गेले. ग्रामपंचायत मार्फत डेंग्यू व टायफाईडच्या साथरोगावर घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्या जात आहे. साथरोग सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच घराघरातील आढळलेल्या दुषीत पाण्याच्या टाकीमध्ये व सांडपाणी नाल्यांमध्ये टेनिफास्ट अँक्टीव्हीटी करण्यात येत आहे. तसेच ग्रा. पं. च्या वतीने या पंधरा दिवसांमध्ये धुर फवारणी, जंतुनाशक फवारणी, हायप्रोक्लोरोफाईड फवारणी करण्यात आली. खताचे ढिगारे गावाच्या व परिसराच्या बाहेर उचलण्याचे सांगण्यात येत आहे. तसेच परिसर स्वच्छते साठी ग्रामपंचायत मधील पदाधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वतः जणआरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी उपाययोजना करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार मुनादी द्वारे जनजागृती करण्यात येत आहे . तसेच आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः हुन खबरदारी म्हणुन स्वच्छता राखण्याचे आवाहन कोरोना जनजागृती समिती कडुन करण्यात येत आहे. मात्र शहरातील नगर पालिका फक्त गाजावाजा करून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्यासाठी कटिबद्ध आहे. अंजनगाव शहरातील मुख्यवस्ती मधील नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले त्यावेळी घाण व गाळ देखील नागरिकांच्या घरात व घरासमोर जमा झाला त्यावेळी नगर पालिका बिनधास्त असल्याचे दिसले रोग प्रतिबंधक फवारणी देखील त्या भागात झाली की नाही हा वादीत प्रश्न आहे. त्यात शहरातील नाल्या बंद करून नागरिकांचे भविष्य धोक्यात टाकले असल्याचे दीसत आहे. नाल्यांची सफाई करण्यासाठी झाकलेल्या नाल्यांवर चेंबर देखील ठेवले नसल्यामुळे नाली सफाई नाही.ज्यामुळे नगर पालिका कार्यक्षेत्रातील साथरोगा पासून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण कसे करावे ह्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शिक्षण घेणे क्रमप्राप्त असल्याचे दिसून येत आहे.


 


पोकळ घोषणा नाही तर ग्रामीण रुग्णालयात सुधारणा करा.... 


केंद्र शासनाच्या कार्यावर डोळा ठेऊन असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांनी गावाच्या हितासाठी काम करावे. अंजनगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रास, डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगाची लागण शहरासाठी ग्रहण असून त्यावर उपाययोजना करणारे ग्रामीण रुग्णालय दुर्धर अवस्थेत आहे. रुग्णालय दुरुस्तीच्या पोकळ घोषणा करणाऱ्या सत्ता पक्षातील नेत्यांनी जनतेची सहानुभूती प्रधान करण्यासाठी पोकळ घोषणा केल्या मात्र त्या ग्रामीण रुग्णालयात एक सक्षम वैदयकिय अधिकाऱ्याची नेमणूक करू शकले नाहीत. जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी देखील फक्त नेमणूक केल्याचे पत्र काढले मात्र अद्यापही कोणीच स्थायी वैधकीय अधिकारी दीला नाही. जर फक्त राजकीय खेळी साठीच ह्या तालुकाचा उपयोग करायचा असेल तर बेशक करा मात्र येणाऱ्या काळात त्याचे प्रश्नासाठी तय्यार रहा. 


गजानन हुरपडे, 


जिल्हा कार्याध्यक्ष 


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ अमरावती


 


कोरोना राहिला मागे आता डेंग्यू ची मोठ्या प्रमाणात लागण... 


अंजनगाव सुर्जी शहरातील कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भाव सोबतच आता शहरात डेग्यू चे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. आपल्या नगरपरिषदने मच्छर फवारणी, नाले साफसफाई याच्या दुर्लक्ष केले म्हणून साथरोगाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चित्र दिसत असून यावरून सिद्ध होते की, न. प. प्रशासनाला गावातील लोकांची किती काळजी आहे. 


श्रीकांत नाथे 


प्रहार कार्यकर्ता सुर्जी अंजनगाव


 


शहरात मलेरिया प्रतिबंधित फवारणी सुरु आहे... 


अंजनगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहरात मलेरिया प्रतिबंधित फवारणी सुरु असल्याची माहिती एका वॉट्सअप ग्रुपवर दीली. 


मुख्याधिकारी अलोणे नगर पालिका अंजनगाव सुर्जी 


अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगाची लागण


अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरिया सारख्या अनेक आजाराने अंजनगावचे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे मुख्य कारण आहे, की शहरात कोणतीही डास प्रतिबंधक फवारणी झाली नाही. तसेच शहरातील सर्वात मोठा सांडपाणी गटार नाला यावर्षी साफ केला नाही, परिणामतः नागरिकांच्या घरात पाणी घुसले. यावेळी तर हजारो - लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने कोणालाही मदत केली नाही. त्यानंतर हा नाला फोडून पान अटाई रोडवर पाणी काढण्यात आले होते. सांडपाणी गावात सोडल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले. तेव्हाच जर फवारणी झाली असती तर हे रुग्ण आढळले नसते. परंतु सर्व शहराचे नुकसान झाल्यावर प्रशासनाला जाग येते, हे कितपत योग्य आहे. यात जनता ही तेवढीच जबाबदार आहे, कारण जनता आवाज उठवत नाही, किंवा नगरसेवक लक्ष देत नाहीत.


डॉ. नंदकिशोर पाटील 


अध्यक्ष मानव विकास सेवा फाउंडेशन अंजनगाव



Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image