महादेव कोळी समाजाची बैठक संपन्न
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- सुरेंद्र शेलार
रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, तळा या तालुक्यातील महादेव कोळी समाज बांधव यांची दिनांक २०/१०/२०२० रोजी मु. मेंदडी, ता. म्हसळा, जि.रायगड या ठिकाणी संयुक्त सभा संपन्न झाली, सदर सभेमध्ये श्री. ज्ञानदेव नागु तांडेल रा.वाशीहवेली ता.तळा यांची १३ गाव महादेव कोळी समाज (श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड) या कोळी समाजाच्या वतीने अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून अध्यक्ष पदाची महत्वाची धुरा सांभाळून समस्त महादेव कोळी समाजाच्या हितासाठी तसेच समजामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून समाजाच्या विकासासाठी सदैव कार्यतत्पर राहणार आहे असे शपथबद्ध झाले आहेत तरी समस्त महादेव कोळी समाज यांच्यावतीने श्री. ज्ञानदेव नागु तांडेल यांना जाहीर पाठींबा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..