कैवल्य फास्ट फुड हॉटेलचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन.

कैवल्य फास्ट फुड हॉटेलचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन.


महाराष्ट्र २४ आवाज



उपसंपादक- लक्ष्मण कांबळे


लातुर : लातूर शहरातील पाच नंबर चौकात २ ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता कैवल्य फास्ट फूड या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उत्तमराव दबडगावकर यांच्या हस्ते व्यंकटराव पनाळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 


तसेच हॉटेलचे संचालक मिलिंद दबडगावकर आणि किरण लोंढे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मोहिते, संतोष पनाळे यांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 


हॉटेल च्या उद्घाटनप्रसंगी ग्राहक हेच दैवत समजून सेवा करावी असे सांगून हॉटेल चे संचालक मिलिंद दबडगावकर आणि किरण लोंढे यांना व्यंकटराव पनाळे यांनी हॉटेल व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या.



या कैवल्य फास्ट फूड च्या उद्घाटन कार्यक्रमास मंगेश लुल्ले, जांभळे, गोविंद कोमटवाड, चंदन पनाळे, परमेश्वर बंडगर, विशाल पाटील, शंकर वाघमारे, सतीश मस्के पाटील, सुरज चव्हाण, इस्माईल शेख, प्रीतम कांबळे, सतीश शिंदे, बसवराज पाटील, माने आदी उपस्थित होते.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image