प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू यांचा आगळावेगळा वाढदिवस
शासकीय रुग्णालयात डॉक्टर व सेवक यांचा सन्मान व रुग्णांना फळ वाटप करून केला जन्मदिन साजरा
महाराष्ट्र २४ आवाज
ठाणे( किरण पडवळ) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य युवा कार्यध्यक्ष तसेच शब्द भुषण वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आयु प्रशांत देविदास राजगुरू यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपस्थिती सर्व डॉक्टर तसेच सर्व कर्मचारी यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ व करोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करून रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांना फळे वाटप करून आपला जन्मदिवस साजरा केला.
करोना संकटकाळात आपल्या जीवावर उध्दार होऊन जनसेवा, देशसेवा करण्यासाठी सातत्याने योगदान देणारे आरोग्य कर्मचारी व सेवक यांच्या कार्याची दखल घेत उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील उपस्थित सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचा करोना योध्दा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करून आभार व्यक्त केले. तसेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना फळे वाटप करून आपला जन्मदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.
करोना संकटसमयी आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आपला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य युवा कार्यध्यक्ष तसेच शब्द भुषण वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आयु प्रशांत देविदास राजगुरू आपला सन्मान करत आहेत यामुळे सर्व डॉक्टर तसेच कर्मचारी अतिशय आनंदी होऊन संघटनेचे व आयु प्रशांत देविदास राजगुरू यांचे आभार व्यक्त करत होते.
सदर कार्यक्रमात उल्हासनगर येथील डॉ.जाफर तडवी (अति.जिल्हा शल्यचिकित्सक),डॉ. सुशिला कांबळे - वैद्यकीय अधिकारी,डॉ.भावना तेलंगे- वैद्यकीय अधिक्षक, डॉ. सुहास मोहनाळकर,डॉ. सुचिता गोरे- वैद्यकीय अधिकारी,सौ.मंगला खडसे-अधिसेविका,आयु.सुमन गोवंदे सह अधिसेविका, आयु.सुनिता कांबळे - परिचारिका,आयु.संदेश पाटील - कक्ष सेवक, आयु.नितीन शिंदे - कक्ष सेवक, आयु.प्रविण वाणी कक्षसेवक, आयु.सारिका रूपवते - परिचारिका,आयु.गीता दळवी - परिचारिका, आयु.प्राचि मोरे परिचारिका, स्वप्नील पाटील कनिष्ठ लिपिक,आयु विजय परमार सफाई कर्मचारी,आयु.सुनील धाराक सफाई कर्मचारी, आयु.कुलदीप शिंदे वाहनचालक,संतोष उन्धले वाहनचालक आदी डॉक्टर,परिचारिका, सेवक, सफाई कामगार यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
करोन संकटकाळात कर्तव्यदक्ष राहून रुग्ण सेवा देताना स्वतः बाधित होऊन म्रूत्यु शी झुंज देऊन पुन्हा आपल्या सेवेत हजर राहण्यार्या माझ्या सर्व डॉक्टर, कर्मचारी, सेवक यांचा आपण जो आज सन्मान केला तो खरोखरच आम्हाला भारावून टाकणारा, तसेच नव्याने उर्जा देणारा आहे. आमच्या कार्याबद्दल,योगदानाबद्दल आपण जे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देले त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभार व्यक्त करतो असे भावनिक उदगार उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जाफर तडवी यांनी कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.
तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे आजारी असल्याने रजेवर असताना सुध्दा त्यांनी आयु.प्रशांत राजगुरू यांना फोन व्दारे शुभेच्छा देऊन त्यांनी हि आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण पडवळ, डॉ स्वप्नील जाधव, आतिश जाधव,रविंद्र इंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले.